Free Marathi Marriage Biodata Maker - मराठी बायोडाटा फॉर्मेट

मराठी मॅरेज बायोडेटा म्हणजे असे एक बायोडेटा डॉक्युमेंट आहे, जे महाराष्ट्रातील लोक अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज करण्यापूर्वी मुलीला किंवा मुलाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या मराठी या मातृभाषेत लिहितात. या डॉक्युमेंटला Marathi Biodata Format असे देखील म्हटले जाते.

marathi biodata maker hero image

बायोडाटा मराठी हा इंडो-आर्यन उपविभागामध्ये मोडणाऱ्या भाषेंपैकी एक असणाऱ्या मराठी भाषेत लिहिला जातो. तुम्हाला महाराष्ट्रातील मराठी फॅमिली साठी बायोडेटा तयार करायचा असेल तर तो तुम्ही मराठी भाषेतच तयार केला पाहिजे जेणेकरून तो त्यांना सहजपणे समजेल.

मराठी बायोडेटा फॉर्मेट तयार करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या?

मराठी भाषा ही विविधतेने नटलेली आहे. तुम्हाला मराठी भाषेतील बायोडेटा मध्ये काना, मात्रा, वेलांटी असे व्याकरणातील काही पैलू पहायला मिळतील. म्हणून तुमचा बायोडेटा फॉर्मेट हा अचूक असणे फार गरजेचे आहे.

आता आपण खाली Marathi Biodata Format तयार करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या हे पाहणार आहोत.

मराठी बायोडाटा टेंप्लेट मध्ये लिहण्यात येणारी माहिती सुटसुटीत आणि स्वच्छ स्वरूपात असली पाहिजे.

  • हा बायोडेटा तयार करताना तुम्हाला देवनागरी लिपीचा वापर करायचा आहे.
  • बायोडेटा आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही बायोडेटा कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 700 अक्षरांमध्ये लिहिला पाहिजे.
  • बायोडेटा समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसण्यासाठी तुम्हाला डार्क स्वरूपातील Marathi Biodata Template चा वापर केला पाहिजे.
  • बायोडेटा साठी वापरण्यात येणारे फॉन्ट हे तुम्ही मराठी भाषेमधील वापरले पाहिजेत जसे की, AMS Calligraphy, Shivaji, Kruti Dev, Devlys इत्यादी.
  • त्याचप्रमाणे माहिती ही तुमची समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसेल अशा फॉन्ट साइझ मध्ये असावी. बायोडेटामधील अक्षरांची फॉन्ट साइझ ही 15px ते 28px उत्तम मानली जाते.

खाली तुम्हाला काही मराठी बायोडाटा टेंप्लेट दिलेले आहेत त्यांचा संदर्भ तुम्ही तुमचा बायोडेटा तयार करण्यासाठी घेऊ शकता.

हे सुटसुटीत वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती असलेले मराठी बायोडेटा डिझाईन.
हे अत्यंत सोबर आणि रॉयल लुक देणारे क्लासिक मराठीत विवाह बायोडेटा टेम्पलेट.

लग्नाचा बायोडेटा तयार करताना तुम्ही त्याच्यामध्ये आध्यात्मिक माहिती समाविष्ट करायची आहे.

Lagnacha Biodata Marathi मध्ये तयार करताना आध्यात्मिक माहिती समाविष्ट करावी. जेणेकरून तुमचा बायोडेटा हा तुमच्या संस्कृतीशी धरून आहे असा दिसेल. तसेच यामुळे मुलगा आणि मुलगी या दोघांमधील ज्योतिषशास्त्रामधील काही गुणांची जुळवा-जुळव करण्यास मदत होते.

आता आपण विवाह करताना कोणकोणत्या ज्योतिषविषयक गुणांची तपासणी केली जाते हे बघणार आहोत. उदाहरणार्थ,

  • राशी (Zodiac sign): बायोडेटा मधील राशी ही ज्योतिष शास्त्र विषयातील एक महत्त्वाचा भाग आहे. तुमची रास ही चंद्राच्या दिशेवरून अवलंबून असते व ती तुमच्या जन्माच्या वेळेनुसार ठरवली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बायोडेटा मध्ये अचूक रास समाविष्ट केली पाहिजे.
  • नक्षत्र (Nakshatra): नक्षत्र म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म चंद्र नक्षत्र स्थितीमध्ये होतो ती स्थिती म्हणजे नक्षत्र. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 27 नक्षत्रे आहेत.
  • गण (Gan): गण हा पण खूप महत्त्वाचा आहे. गण हा तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमचा स्वभाव कसा आहे हे दर्शवितो.
  • नाडी (Nadi): बायोडेटातील नाडी हे तुमचे पुढील कौटुंबिक आयुष्य कसे आहे हे दर्शविते.
  • मांगलिक (Manglik): यामधून तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे की नाही हे समजते. परंतु आजकालच्या या युगात काही कुटुंब लग्न ठरवताना याला खूप महत्त्व देत नाहीत.
  • गोत्र (Gotra): गोत्र यामधून तुमची वंशपरंपरा किंवा कुलपरंपरा बघितली जाते. आपल्या भारतात एकूण 49 मुख्य गोत्र आहेत आणि बाकीचे हजाराहून जास्त उप गोत्र आहेत.

वरती सांगितलेल्या सर्व बाबी तुम्ही Lagnacha Biodata तयार करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मराठी बायोडाटा कसा तयार करायचा मराठी बायोडाटा मेकर फ्री चा वापर करून?

बायोडेटा तयार करण्यासाठी तुम्हाला मुख्यतः एकूण चार विभागातील माहितीची गरज असते, म्हणजेच बायोडेटामध्ये तुम्हाला आध्यात्मिक माहिती, वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती आणि संपर्क माहिती समाविष्ट करायची असते.

1)आध्यात्मिक माहिती

आपण जन्मापासून ते मरेपर्यंत अध्यात्माशी जोडलेले असतो त्यामुळे अध्यात्माचे काही गुण तुमच्यात आहेत हे दर्शवण्यासाठी तुम्हाला बायोडेटा वरती देवी-देवतांचे फोटो ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला आवडणाऱ्या व तुमची श्रद्धा असलेल्या देवांची नावे देखील समाविष्ट करायची आहेत.

Marathi Biodata Makerनुसार बायोडेटा वरती तुम्ही किमान एक देवाचा फोटो व एक देवाचे नाव समाविष्ट करायचे आहे. जर तुम्हाला अधिक नावे समाविष्ट करायची असतील तर जास्तीत जास्त तीन नावे समाविष्ट करावीत.

खाली तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी मराठीत कशा वापरायच्या याबद्दल इमेज जोडलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता.

marathi biodata spiritual info demo
2)वैयक्तिक माहिती

तुमच्या समोरच्या व्यक्तीला तुमच्या स्वभावाबद्दल तुमच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तसेच तुमच्या आवडीनिवडी बद्दलची माहिती माहित होण्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. याच्या मध्ये तुम्ही खालील बाबी समाविष्ट करायच्या आहेत.

  • नाव: [तुमचे पूर्ण नाव] (उदा., स्नेहा संजय पाटील)
  • जन्म तारीख: [तुमची जन्म तारीख] (उदा., 12/04/2000)
  • जन्म वेळ: [तुमची जन्म वेळ] (उदा., रात्री 08 वा. 12 मि.)
  • जन्म स्थान: [तुमचे जन्म स्थान] (उदा., पुणे)
  • रास: [तुमची रास] (उदा., मेष)
  • मंगळ: [तुमची मंगळ स्थिती] (उदा., नाही)
  • धर्म: [तुमचा धर्म] (उदा., हिंदू)
  • जात: [तुमची जात] (उदा., मराठा)
  • वजन: [तुमचे वजन] (उदा., 58 किलो)
  • उंची: [तुमची उंची] (उदा., 5 फूट 4 इंच)
  • रक्तगट: [तुमचा रक्तगट] (उदा., A+)
  • वर्ण: [तुमचा वर्ण] (उदा., गोरा)
  • शिक्षण: [तुमचे शिक्षण] (उदा., बी.ई.)
  • अपेक्षा: [तुमच्या अपेक्षा] (उदा., सुशिक्षित वर हवा)
3)कौटुंबिक माहिती

वरील वैयक्तिक माहिती मध्ये आपण बघितले की तुम्ही स्वतःची माहिती देता. आता यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती द्यायची आहे.

  • वडिलांचे नाव: [तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव] (उदा., संजय मारुती पाटील)
  • वडिलांचा व्यवसाय: [तुमच्या वडिलांचा व्यवसाय] (उदा., शेतकरी)
  • आईचे नाव: [तुमच्या आईचे पूर्ण नाव] (उदा., सविता संजय पाटील)
  • आईचा व्यवसाय: [तुमच्या आईचा व्यवसाय] (उदा., गृहिणी)
  • बहीण: [तुमच्या बहिणीची माहिती] (उदा., बहीण नाही)
  • भाऊ: [तुमच्या भावाची माहिती] (उदा., एक भाऊ)
4)संपर्क माहिती

याच्यामध्ये तुम्हाला जर पुढील व्यक्तीला तुमच्याशी व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, किंवा स्नॅपचॅट द्वारे संपर्क साधायचा असेल तर त्याबद्दल तुमची संपर्क माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे.

  • पत्ता: [तुमचा पूर्ण पत्ता] (उदा., प्लॉट 12, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र)
  • मोबाईल नंबर: [तुमचा मोबाईल नंबर] (उदा., 9756XX8756)
  • ईमेल आयडी: [तुमचा ईमेल आयडी] (उदा., your.id@example.com)
  • फेसबुक प्रोफाइल: [तुमची फेसबुक प्रोफाइल लिंक] (उदा., https://facebook.com/your-id)
  • इंस्टाग्राम प्रोफाइल: [तुमची इंस्टाग्राम प्रोफाइल लिंक] (उदा., https://instagram.com/your-id)

वरील माहितीचा अभ्यास करून तुम्ही जर तुमचा बायोडेटा तयार केला तर तो कसा दिसेल हे बघण्यासाठी खाली काही Biodata Format for Marriage in Marathi दिलेले आहेत.

मराठी बायोडेटा मेकर वापरून सोनेरी फ्रेम असलेले आणि साडीतील मुलीचा फोटो असलेले हे एक सुंदर डिझाईन आहे.
ही मुलाचा मराठी बायोडेटा फॉर्मेट पांढऱ्या बॅकग्राउंडवर व श्री गणेश प्रतिमा आणि सुटसुटीत माहितीची मांडणी असलेली डिझाईन आहे.

आमच्या ऑनलाइन बायोडेटा मेकर मराठी फ्री चा वापर करून तुम्ही बायोडाटा खालील फॉरमॅट्स मध्ये डाउनलोड करू शकता

Biodata for Marriage in Marathiतयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो बायोडेटा तुम्ही योग्य त्या फॉरमॅट्स मध्ये डाऊनलोड करून तो समोरच्या व्यक्तीला पाठवणे महत्त्वाचे आहे. पूर्वी जेव्हा ऑनलाईन पद्धत आपल्या भारतामध्ये प्रचलित नव्हती त्यावेळी लोक पोस्टाद्वारे लिखित बायोडेटा पानावरती लिहून पाठवत होते.

आत्ताच्या या ऑनलाइन व सोशल मीडियाच्या युगात सर्वांकडे मोबाईल किंवा लॅपटॉप आहेत. तसेच सोशल मीडिया ऍप्स देखील आहेत. त्यामुळे बायोडेटा पाठवणे खूप सोपे झाले आहे. जसे की व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, गुगल ड्राईव्ह, किंवा गुगल फोटोज इत्यादी ॲप्स द्वारे तुम्ही तुमचा तयार झालेला बायोडेटा पाठवू शकता.

वरील ॲप्स वरून जर तुम्हाला बायोडेटा शेअर करायचा असेल, तर तो तुम्हाला PDF, Word किंवा PNG स्वरूपात पाठवायचा आहे. आमच्या बायोडेटा मेकर फ्री चा वापर करून तुम्ही तुमचा बायोडेटा खालील फॉरमॅट्समध्ये डाऊनलोड करू शकता.

  • आमच्या Free Biodata Maker Marathi मध्ये दिलेल्या आध्यात्मिक माहिती, वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती आणि संपर्क माहितीचा उपयोग करून A4 आकारामध्ये ऑनलाइन स्वरूपात तुमचा मराठी बायोडेटा फॉरमॅट PDF डाउनलोड करू शकता.
  • तसेच डाऊनलोड केलेली PDF फाईल Word मध्ये समाविष्ट करून Marriage Biodata in Marathi Word Format तयार करून डाऊनलोड करू शकता.
  • त्यानंतर PNG फॉर्मेट ही सर्वात सोपी पद्धत मानली जाते. ती देखील तुम्हाला 1061px × 1500px फाइल आकारामध्ये सोप्या पद्धतीने डाऊनलोड करता येईल.

अशाप्रकारे वरील सांगितलेल्या सर्व माहितींचा जर अभ्यास केला तर तुम्ही तुमचा मराठी बायोडेटा घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता फक्त ५ मिनिटांत.

What Our Users Say

"आपला मोफत मराठी विवाह बायोडाटा मेकर वापरल्यानंतर लोक काय म्हणतात ते खाली दिले आहे."

5.0 out of 5 (2,356 Reviews)
विवान कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र

"माझ्या मित्राने मला या वेबसाइट बद्दल सांगितले. या वेबसाइट च्या मदतीने मी घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात मोबाईलवरती फ्री मध्ये लग्नासाठी मराठी बायोडाटा तयार करून तो व्हॉट्सऍप आणि फेसबुक ला माझ्या नातेवाईकानं पाठवला तो ही फक्त 2 मिनिटांत, यावर माझा विश्वासच बसत नाही. ही फ्री मराठी बायोडेटा मेकर वेबसाइट खूप छान आहे. धन्यवाद!"

5/5
15 नोव्हेंबर 2025
स्नेहा कदम

नाशिक, महाराष्ट्र

"मराठी बायोडाटा फॉर्मेट मध्ये माहिती भरण्यापासून ते डाउनलोड करण्यापर्यंतची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्व माहिती योग्य ठिकाणी व्यवस्थित सेट होते. मराठी बायोडेटा टेम्प्लेट मध्ये माहिती भरली की ती दिलेल्या फॉन्ट आणि महाराष्ट्रातील नामांकित टेम्पलेट्समध्ये कशी दिसते हे देखील आपण लगेच पाहू शकतो."

5/5
28 मार्च 2026
अर्जुन गायकवाड

सातारा, महाराष्ट्र

"मला मराठीमध्ये बायोडेटा डाऊनलोड करायचा होता आणि तो इथे खूप साऱ्या फाईल्स फॉरमॅट्स मध्ये डाऊनलोड करता आला. जसे की प्रिंटसाठी मराठी बायोडेटा फॉर्मेट PDF फ्री मध्ये डाऊनलोड केली व व्हॉट्सअपला पाठवण्यासाठी PNG, त्यानंतर लग्नाचा बायोडेटा मराठीमध्ये Word फॉर्मेट फाईल सुद्धा डाऊनलोड केली."

5/5
02 एप्रिल 2026
आरोही पाटील

सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

"वेबसाइट तर चांगली आहेच, त्याचप्रमाणे मला बायोडेटा तयार करताना माहिती कोणकोणती भरावी बायोडेटामध्ये याबद्दल एक अडचण आली होती, पण यांच्या support@marriagebiodata.ai या मेल ला मी संपर्क केल्यानंतर ती लगेच सपोर्ट टीमने सोडवली. येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी यांची सपोर्ट टीम तत्पर आहे."

5/5
22 जून 2026
Frequently Asked Questions

होय, त्यासाठी तुम्हाला या तीन पायऱ्यांचे पालन करावे लागेल. १) तुम्हाला बायोडेटा फॉर्ममध्ये तुमची माहिती भरावी लागेल. २) तुम्हाला प्रिव्ह्यू पेजवर दिसणारे डिझाइन १२ (साधे) निवडावे लागेल. ३) त्यानंतर, तुम्ही तुमचा बायोडेटा मोफत डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्रामध्ये मराठी बायोडेटा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उदाहरणार्थ, यालाच लग्नाचा बायोडेटा (Lagnacha Biodata), विवाह बायोडेटा (Vivah Biodata) किंवा परिचय पत्र (Parichay Patra) म्हणतात. ज्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची आध्यात्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि संपर्क माहिती देता.

जर तुम्ही वरील सर्व माहितीचा संदर्भ घेतला आणि बायोडेटा तयार करण्यासाठी आमच्या बायोडेटा मेकरची मदत घेतली, तर तुम्ही तुमचा मराठी बायोडेटा फक्त पाच मिनिटांत PNG, PDF आणि Word फाईल फॉरमॅटमध्ये ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

होय, आम्ही हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आणि जैन यांसारख्या वेगवेगळ्या धर्मांसाठी टेम्पलेट्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचा वापर करून, तुमचा धर्म कोणताही असो, तुम्ही त्याचे टेम्पलेट निवडून तुमचा बायोडेटा तयार करू शकता.

आमच्या वेबसाइटवर तुमच्या बायोडेटामधील माहितीच्या संरक्षणाला प्रथम प्राधान्य दिले जाते. वेबसाइट SSL सर्टिफिकेट आणि HTTPS द्वारे संरक्षित आहे, जे तुमच्या डिव्हाइसवरील माहिती एन्क्रिप्ट करते.

तुम्ही बायोडेटा फॉर्ममध्ये टाईप केलेली आध्यात्मिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती आम्ही आमच्या सर्व्हरवर साठवत नाही. तसेच, ती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा तृतीय पक्षाला विकली किंवा शेअर केली जात नाही. महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांनी आमच्या वेबसाइटचा वापर केला आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे तुमचा विवाह बायोडेटा तयार करू शकता.

Start Your Marriage Biodata Journey Today

Easily create biodata on mobile or desktop and download, edit, share with just a few clicks.